सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 अतुलनीय वैज्ञानिक योगदानाबद्दल डॉ. हेमचंद्रन रविकुमार यांना कर्मवीर चक्र पदक व रक्स कर्मवीर ग्लोबल फेलोशिपने सन्मानित करण्यात आले.
〉 अर्जेटिनाचा फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीला टाइम्स अॅथलीट ऑफ द इयर 2023 म्हणून गौरविण्यात आले.
〉 भारतीय वंशाच्या लेखिका मिरा चंद यांना सिंगापूरचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार कल्चरल मेडलियनने सन्मानित करण्यात आले.
〉 भारतीय लेग स्पिनर रवी विश्नोई ICC T-20 क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज बनला आहे.
〉 06 डिसेंबर 2023 रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
〉 भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांना स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर 2023 ने सन्मानित करण्यात आले.
〉 भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने 'व्हिलेज मॅप' हे भौगोलिक माहिती प्रणाली ऍप्लिकेशन सुरू केले.
〉 फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत चार भारतीय महिलांचा समावेश आहे.
〉 हरियाणा राज्य सरकारने पांजोखरा गावाचे नाव बदलून ' पंजोखरा साहिब' केले.
〉 पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता सलग तिसऱ्यांदा सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे.
〉 अलीकडेच भारताची इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायझेशन 【IMO】 दोन वर्षांसाठी फेरनिवड झाली.
〉 उत्तराखंड राज्याच्या 18 नवीन उत्पादनांना GI टॅग प्राप्त झाला आहे
〉 जागतिक बँकेने COP28 शिखर परिषदेत जागतिक स्तरावर मिथेन उत्सर्जनाचा सामना करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले.
〉 ONDC ने डिजिटल कॉमर्स स्पेसमधील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी 'बिल्ड फॉर भारत' उपक्रम सुरू केला
〉 सुगंधी सुंदरराज यांना PRSI राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले






Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!